राज प्रकरणावर मि.पा. वर झालेले सवाल जवाब
(http://www.misalpav.com/node/4118)With Madanban:(His points in italic)
बी.इ होऊन सुद्दा मराठी मुल दारोदार सेल्समन बनुन फिरतात हे मी स्वतः पाहिले आहे..
आणि अक्षरशः मोजके शिकलेले गुज्जु - माडू लाखो करोडो कमावताना ही पाहिले असेल ना? स्वतः धिरुभाई किती शिकले होते ?स्वतःच्या कमकुवतीसाठी इतरांना किती दिवस जबाबदार धरणार ? जर भय्या लॉब्या करत असतील तर त्यांना तशाच मार्गाने उत्तर द्यावे,.लोकसभेत ४८ खासदार पाठ्वतो आपण. हे खासदार जर बांडगुळासारखे निरुपयोगी असतील, राज्यातल्या तरुणाना नोक-या देण्यात अक्षम असतील, तर दोष पुन्हा आपलाच आहे.साला, लॉब्या करा, दबाव आणा
हा प्रकार दक्षिणेत का होत नाही?महाराष्ट्रीय लोकांनी काय ठेका घेतलाय का परप्रांतिय लोकांना नोकर्या देण्याचा??
हो महाराष्ट्रीय लोकांनी ठेका घेतलाय. आधी येऊ द्यायचे हिन्दी राष्ट्र्भाषा म्हणुन डोक्यावर नाचवायचे आणि मग पाणी गळ्यावर आल्यावर आकांत करायचा . हा मुर्खपणा नाहीतर दुसरे काय ?ते आपल्यासारखे मुर्ख नसल्याने हे प्रकार दक्षिणेत होत नाहीत.
---राज ठाकरेंच्या नवशिवसेनेचे उपाय मुळात जुन्या शिवसेनेचेच आहेत. आणि ते किती निरुपयोगी आहेत हे शिवसेनेच्या उदा. वरुन सिद्ध झालेच आहे. कोणी मसिहा येईल, आमचे कल्याण करेल अशी फुकाची आशा आपण का धरुन बसतो ? एकी करून बाकीचे पुढे जातात हे आपल्याला केव्हा कळणार ???
-----------------
With Vetaal
जर राज चा मार्ग चुकीचा आहे असे तुम्हाला वाटत असेल तर कोणता मार्ग योग्य आहे हे तुम्ही सांगा.??
मला वाटते कर्नाटकातील काही महिन्यांपुर्वीचे उदा पुरेसे बोलके आहे. बंगळुरातल्या यशवंतपुरजवळ नैऋत्य रेल्वेच्या चतुर्थ श्रेणी भरतीसाठी परिक्षा होती. उत्तरी लोंढे येथे ही दाखल झाले होते. कर्नाटक रक्ष्णा वेदिकेच्या लोकांनी परिक्षा रोखली पण
१ यात कोणत्याही भय्यावर हात उगारण्यात आला नाही.
२ रेल्वे आधिका-यांकडे "पारदर्शकते"ची "विचारणा" करण्यात आली ( असहाय्य लोकांवर हात उगारण्यात काय मर्दानगी ? पंगा घ्यायचाय तर .. !)
३ परिक्षा नोटिस किती स्थानिक वर्तमानपत्रात होती याची खातरजमा करुन ही परिक्षा पुढे ढकलवण्यात आली .सर्वात महत्वाचे ..
यात भय्या द्वेष "हायलाईट" न करता "स्थानिकांना योग्य संधी" इतकीच भाषा होती.
इतरांना फुकट मारहाण करुन आपल्या उद्दिष्टाची हानी होणार नाही याची काळजी घेतली गेली.खासदारांचा योग्य तो उपयोग केला गेला.मीडिया मधे कानडी समाजाची संकुचित नव्हे तर "आपल्या हितांसाठी जागरुक" अशी प्रतिमा जाईल याची काळजी घेतली गेली.
आपल्याकडे काय होते ??केवळ उलट .. जे करायचे ते केलेच जात नाही.
--------
Objections from Abhidnya:
अभिरत,
आपण बेंगलोरात किंवा कर्नाटकात किती वर्षे आहात ते माहित नाहि,किंवा एकंदर नवखे दिसता.आपण उल्लेख केलेले प्रकार फारच वरवरचे आहेत. भय्या लोकांच्या प्रश्नावर कन्नड रक्षण वैदिकेने जोरदार आंदोलन केलेले होते.हुबळि येथील रेल्वे कार्यालयात घुसुन तोडफोड केलेली होती. जागोजागी रेल्वेरोको आंदोलन करण्यात आले होते.खुद्द लालु यादव ज्या रेल्वेतुन आलेले होते ती सुध्दा आडवण्यात आलेली होती.रेल्वेभरती होणार कर्नाटकात व त्याच्या जाहिराती बिहारमधे???स्थानिक मिडियाने देखील हा मुद्दा जोरदार लावून धरला होता.थोडे स्पष्टच लिहितो, हिंदि मिडियाच्या *** दम आहे का त्यावर चकार शब्द काढायचा?आसाम,पंजाब मध्ये काय होतेय? तिथे तर बौंब फुटत आहेत.त्यावर का नाहि मिडिया आकांडतांडव करत?मी गेले ५ वर्षे कर्नाटकात राहिलो आहे. भाषा व स्वतःची संस्कृती ह्यावर हि मंडळी फारच हळवी आहेत.तामिळनाडु बरोबर वाद असु देत कि बेळगाव प्रकरणी महाराष्ट्रा बरोबर,सर्वच राज्यकर्ते एकाच सुरात बोलताना दिसतात.बेळगाव प्रकरणात आबा पाटील ह्यांनी बेळगावात सभा घेतलि होती. त्याच निषेध म्हणुन संपुर्ण कर्नाटकात कडकडित बंद पाळण्यात आलाहोता. नुसतीच दुकाने बंद नव्हति तर केबल वरील सर्व अकन्नड चॅनेल्स बंद ठेवलेले होते.इतकेच नव्हे तरविधानसभे समोर रस्त्यावर आबा पाटील व विलासराव देशमुख ह्यांचे जाहिर श्राध्द घालण्यात आलेले होते.त्याचे फोटो दुसर्या दिवशी सर्व स्थानिक वर्तमानपत्रात पहिल्या पानावर होते. हे महाराष्ट्रातील किती लोकांना माहिती आहे?बाकिचे काय म्हणतील ,त्यांना काय वाटेल,मिडियामधे आपली इमेज कशि दिसेल ह्याचा विचार क्त मराठी माणुसच करताना दिसतोपण एक मात्र नक्कीआज जे महाराष्ट्रात घडते आहे ते अजुन ५ वर्षांनी कर्नाटक व गुजरात मधेहि घडताना दिसेल.
--------
My Answers
मग किती सामान्य मराठी माणसांना त्रास दिला ??
अभिज्ञ साहेब,मग आबा पाटीलांचा राग काढण्यासाठी किती सामान्य मराठी माणसांना मारहाण झाली ? (महापौर मोरे व स्थ्लांतरित मराठी समाजातला फरक लक्षात घ्यावा. )
मधे होगेनक्कलचा इश्यु झाला तेव्हा सामान्य तामिळी लोकांना मारहाण न करता होगेनक्कल विवादात कर्नाटकाने आपले हितसंबध जपले यावर ही आपण प्रकाश झोत टाकावा. ( बंगळुरात तामिळी लोकांची ट्क्केवारी लक्षणिय आहे)
बाकिचे काय म्हणतील ,त्यांना काय वाटेल,मिडियामधे आपली इमेज कशि दिसेल ह्याचा विचार क्त मराठी माणुसच करताना दिसतोमीडीयाचा आपल्यावर होणारा अन्याय पोचवण्यासाठी नीट उपयोग करावा असे सांगितले तर चुकले काय? इथल्या स्थानिक संघटनाही हेच करतात. मीडियाची ताकद ओळखुन त्याला आपल्या फेवर मधे वापरण्यात इथल्या स्थानिक नेतृत्वाची हुशारी नक्कीच आहे. हिन्दी मिडिया पक्ष्पाती आहे पण राजच्या मागील प्रकरणात पूर्ण मराठी समाजाविरुद्ध जी गरळ ओकण्यात आली त्याचा प्रतिवाद करण्यात आपण कमी पडलो ही वस्तुस्थिती आहे.
पण एक मात्र नक्कीआज जे महाराष्ट्रात घडते आहे ते अजुन ५ वर्षांनी कर्नाटक व गुजरात मधेहि घडताना दिसेल.
या गृहितकामधे कर्नाटकी वा गुजराती आपल्यासारखे पाणी डोक्यावरुन जातील तोवर वाट पा।हणारे असे समजलेले दिसते. वस्तुस्थिती तशी नाही.
-------
Vetal still not agreeing
राव जरा ईचार करा की.बेगलरु मध्ये तुम्ही काय सरकारी नोकरी करता जाता काय? खाजगी नोकरयातल्या जागा बद्दल आपण भांडत नाही आहे ,आपण सरकारी नोकरयाबद्दल वाद करित आहात. ज्या त्या राज्यातल्या सरकारी नोकरीत सर्व प्रथम तेथील स्थानिक बेरोजगारांचा हक्क असतो.तसेच युपी-बिहार मध्ये सरकारी नोकरीसाठी कोणी मराठी माणुस जात असेल्(युपीएससी पोस्ट सोडुन) असे मला वाटत नाही.राहिले आपली इमेज टिकवण्याचा प्रश्न .राव आपणच जर ह्यात टिकलो नाही तर आपली इमेज काय जाळायची आहे काय?काल राजीव शुक्ला नावाचा कॉग्रेस खासदार मुंबई मध्ये म्हणाला छ्टाकपुजा इथे जोरदार पणे करा,सर्व युपी-बिहारीनो मुंबई मध्ये एकत्र या. पुढचा मुख्यमंत्री आपणाला कृपाशंकरशिंह ला करायचं आहे के लक्षात ठेवा.छोट्या मराठी माणसंकडे लक्ष देउ नका.ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे लोक फक्त महाराष्ट्रात पोटापाण्यासाठी येत आहेत?मराठी माणुस आज पर्यंत हे सगळे सहन करत आला कारण आजपर्यंत त्याला साथ देणारा.मार्गदर्शन करणारा कोणी नव्हता.शिवाजी महाराजनी महाराष्ट्रासाठी सुरत लुटली ,तेव्हा त्याना लुटारु म्हणणारे महाभाग पण महाराष्ट्रातले वाझोंटे विचारवंतच होते.( असहाय्य लोकांवर हात उगारण्यात काय मर्दानगी ? पंगा घ्यायचाय तर .. !).........हसु येते हे वाचुन , मराठ्याना मर्दानगी म्हनजे काय ? हे तुमच्या कडुन शिकावे लागणार.एक काम करा ह्याच असहाय्य लोकांबरोबर लॉगरुट्च्या रेल्वे मधुन जनरल च्या डब्यातुन प्रवास करा.मग तिथे मर्दानगी दाखवा तुमची.
-----
My Answers
मराठी माणुस आज पर्यंत हे सगळे सहन करत आला कारण आजपर्यंत त्याला साथ देणारा.मार्गदर्शन करणारा कोणी नव्हता.
मित्रा वेताळा;बाकीच्या प्रत्येक राज्यात परमेश्वराने "मार्गदर्शन क्लासेस " उघडले आणि आपल्या राज्यात काढाय्ला विसरला असे म्हणायचे आहे का?त्या लोकांनी साथ देणारा/ मार्गदर्शन करणारा वगरे मसिहाची वाट न पाहता एकजुटीतुन वाट सुधारली. आपण तसे का करु नये?
हसु येते हे वाचुन , मराठ्याना मर्दानगी म्हनजे काय ? हे तुमच्या कडुन शिकावे लागणार.एक काम करा ह्याच असहाय्य लोकांबरोबर लॉगरुट्च्या रेल्वे मधुन जनरल च्या डब्यातुन प्रवास करा.मग तिथे मर्दानगी दाखवा तुमची.
गड्या, मर्दानगीच्या नावाखाली तर छत्रपतींनी अफझल्याविरुद्ध मोकळ्या मैदानात लढायला हवे होते. पण छत्रपती वीर होतेच पण त्याशिवाय ते चतुर, मुत्सुद्दी ही होते. म्हणुन तर अफझल्या ठार झाला.आपण काय शिकलो ? शुन्य !आज या "दुष्ट"भय्यांना आपंण "जालिम" चोप देऊ. याने तुझ्या रागाचे शमन होईल. पण मुळावर उपाय होणार आहे का ? आज पंजाबच्या लोकसंख्येत भय्या आपल्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आहेत. मग तिथे का हे डोके वर काढत नाहीत. कारण पंजाबच्या आर्थिक नाड्या त्यांनी स्वतःच्या हातात ठेवल्यात. पण त्याही पेक्षा पंजाबियत ची अस्मिता आत जागी ठेवलिये.आपले राज्य गेली ४० वर्षे भारतातील अव्वल राज्य होते. पण आपण ही समृद्धी कमी भोगली.
जर इतरांना मारणे हाच उपाय असता मग १९६० साली पहिल्या शिवसेनेसोबत सारे प्रश्न सुटले असते. किंबहुना १९६० -२००८ आपली परिस्थिती खराबच का होत गेली ?तात्कालिक कारणांने कोणास मारणे समर्थनीय असेलही पण मुळावर उपाय करण्यासाठी आपल्यात काय बदल करायला हवेत; स्वतःला कसे घडवायला हवे याचा विचार नको ?
------
Vetal would not give up
पंजाब मध्ये भय्याच्या विरुध्द काहीच चालु नाही हे म्हणणे चुकीचे आहे. आज भैय्या लोकांच्या विरुध्द महाराष्ट्रा,कर्नाटक,तामिलनाडु.आसाम तसेच पंजाब ,हरियाना राज्यात पण असंतोष आहे. तिथे पण त्याना मनसे स्टाईल ने चोप दिला जातो.राहिला प्रश्नजर इतरांना मारणे हाच उपाय असता मग १९६० साली पहिल्या शिवसेनेसोबत सारे प्रश्न सुटले असते. किंबहुना १९६० -२००८ आपली परिस्थिती खराबच का होत गेली ?हो शिवसेना जशी मराठी माणसाच्या हिताचे रक्षण करण्याकरिता स्थापनझाली तसे तिचे कार्य पण चालु होते. मुंबई मध्ये व इतर शहरात तिचे कार्य जोमाने सुरु होते पण ज्यावेळी शिवसेनेने भाजपचे हिंदुत्व पोर दत्त्तक घेतले तशी पहिल्या पोराची आबाळ झाली.मराठीला कोणी वालीच उरला नाही. पण राज ठाकरेनी हाच मुद्दा उचलुन धरला व मनसे ची स्थापना केली. आता शिवसेनेला तिची चुक उमगली आहे पण त्याला उशीर झाला आहे.म्हणुन पुर्वीच जो प्रश्न सुटला असता त्यासाठी नव्या नेतृत्वाची ,नव्या संघटनेची आपल्याला वाट बघावी लागली.आणखी एक प्रश्न जर का प्रांतवादाचे प्रश्न सांमजसाने सुटले असते तर १०६ जणाना महाराष्ट्रासाठी हुतात्मा व्हावे लागले नसते.
My Answers
जर इतरांना मारणे हाच उपाय असता मग १९६० साली पहिल्या शिवसेनेसोबत सारे प्रश्न सुटले असते. किंबहुना १९६० -२००८ आपली परिस्थिती खराबच का होत गेली ?
शिवसेनेचा संक्षिप्त इतिहास सांगितल्याबद्दल आभार. पण माझ्या प्रश्नाचा रोख आपल्याला समजलेला दिसत नाही.मराठी माणसाच्या वेदना आहेत; जुनी जखम/ समस्या आहे पण इतरांना मारणे ही त्यावरील मलमपट्टी आहे.
तुम्ही या मलमामुळे दुखणी काही काळ विसराल पण आर्थिक आघाडीवर असले उपाय दिर्घकाळासाठी निरुपयोगी असतात." शिवसेनेचा आवाज"(दहशत) घुमत असताना "मराठी माणसाचा आवाज" (आर्थिक व एकूण प्र्भुत्व) क्षीण होत गेले ही वस्तु स्थिती आहे.
कोणी शिवसेना / मनसे आम्हा पामरांची मुक्तता करेल अशी आशा आपण का धरता? मुळात इतर लोकांनी जर त्यांच्या शिवसेना / मनसे शिवाय मुंबई जिंकली असेल तर तुम्ही का नाही करु शकत?
नेमके सांगतो - "सामाजिक पातळिवरच्या शत्रुचा मुकाबला सामाजिक पातळीवर करावाआज आपल्याला स्वतःला बदलुन नव्या आर्थिक वस्तु स्थिती शी ओळख करुन ग्यावी; आपली लॉबी बनवावी.आर्थिक सत्ता ताब्यात घ्यावी. जास्तीत जास्त महत्वाची पदे मिळवावीत. एका रात्रीत होणारे काम नाही. एकजुटीतुन होईल. आपल्याला अशिच चळवळ उभारावि लागेल "
-----------
पंजाब मध्ये भय्याच्या विरुध्द काहीच चालु नाही हे म्हणणे चुकीचे आहे. आज भैय्या लोकांच्या विरुध्द महाराष्ट्रा,कर्नाटक,तामिलनाडु.आसाम तसेच पंजाब ,हरियाना राज्यात पण असंतोष आहे.
भय्याच्या वाढत्या प्रमाणामुळे काही जण अस्वथ असले तरी आज पंजाब ची अर्थ्व्यवस्था आज भय्याच्या मजुरीवर अवलंबुन आहे.
पंजाब्यांनी आर्थिक सत्ता आपल्या ताब्यात ठेवली आहे व बिहारी तिथे केवळ मजुर म्हणुन राहु शकतो. आमच्या राज्यात आम्हीच राजे हा त्यांचा आत्मविश्वास कोठुन आला ?त्यांनी स्व्तःच्या राज्यात (थोड्याफार प्रमाणावर) आपली लॉबी बनवली . आर्थिक सत्ता ताब्यात घेतली . जास्तीत जास्त महत्वाची पदे मिळवली. हे आपण का विसरतो?
एकदोन बिहार्यांना चोप मिळतो हे मान्य. बिहारी म्हणुन सरसकट चोप मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.
तुम्ही पंजाब्यांना सांगा की तुम्ही लॉब्या बनवु नका; महत्वाची पदेसोडा फक्त आम्हा मराठांप्रमाणे फक्त सेना स्टाईल चोप देत राहा. आपल्या मराठ्यांच्या एकुण बुद्धीमत्तेवर सरदारजी ही हसतील.
तुम्ही ऊल्लेख्लेल्या राज्यांपैकी आसाम वगळता कोण्त्याही राज्यातील राजकीय नेतृत्व इतक्या उघडपणे "शिवसेना-गिरि" करणार नाहि. जर खरेच इतक्या राज्यात असंतोष असता तर राज्-प्रकरणाला हिन्दी वि अहिन्दी असे स्वरुप आले असते.भारतीय एकात्मतेचा नारा लावत स्वतःच्या पोळ्या गपचुप भाजण्यात सर्व जण हुषार आहेत. आपण केव्हा शिकणार हा प्रश्न आहे.
बिहार्यांचा त्रास इतरांना झाला नाही अशा थापा ही टाकु नका. कलकत्ता शहर बिहार/झारखंड पासुन अवघ्या काहि तासांच्या अंतरावर आहे. पण "बंगाली ओभिमान" बिहार्यांना कसा पुरुन उरतो ते शिका!हे आमचे शहर, इथे आम्ही आमच्या भाषेत बोल्णार, आम्च्या लोकांना प्राधान्य मिळणार, एकमेकांना मदत करणार हा त्यांच दृष्टिकोन .. आता मला सांगा ह्या मनसे करायच्या गोष्टी आहेत का समस्त मराठी समाजाने. हे च मी कळ्कळीने सांगु इच्छितोय
आता कलकत्त्यात कोणा बिहारीला चोप मिळत नाही असे मी म्हणणार नाहि. पण तुम्हि याचा जाब जर तिथल्या राजकीय नेतृत्वाल विचारला तर " आमी एई जघन्य कृत्येर निंदा कोरि. कोलकाता सारा भारतबोर्षेर शहर. " असे उत्तर मिळेल. हे राज्कीय नेतृत्व आपल्यापेक्षाही प्रादेशिक आहे पण "खायचे दात व दाखवायचे दात" इतके शहाणपण इथे आहे.शिवाय स्वतःची एक्जुट ही इतरांना चोप देण्यापेक्षा जास्त फायदेशीर आहे हे तिथल्या सामन्य माणसाला ही समजते पण ह्या साध्या गोष्टि इकडच्या विद्वांनाही समजत नाहित हे दु:ख आहे
----
सॉफ्ट पॉवर
आणखी एक प्रश्न जर का प्रांतवादाचे प्रश्न सांमजसाने सुटले असते तर १०६ जणाना महाराष्ट्रासाठी हुतात्मा व्हावे लागले नसते१०६ जणांनी प्राण वेचले त्या हौतात्म्याचा उपमर्द न करता काही गोष्टींचा सारासार विचार करु.
तामिळ्नाडू / आंध्र तुलनेने कमी श्रमात राज्य बनले. पण आपल्याला इतकी मेहनत का घ्यावी लागली ?आपली सॉफ्ट पॉवर किंवा उपद्रव क्षमता कमी होती म्हणुन.
आज जर कोर्पोरेट क्षेत्रात वरवरची पदे/ जास्तीत जास्त प्रशासकीय पदे/ जास्त आर्थिक प्रभुत्व यामुळे निर्माण होणारा स्वाभिमान वाढवत गेलो तर साहजिक आपली सॉफ्ट पॉवर वाढेल; जितकी जास्त सॉफ्ट पॉवर पॉवर तितकी कमी मेहनत.१९६० च्या आंदोलनाचे आपण असे विष्लेषण करावे हे माझे मत आहे.
ताजे उदा:श्रीलंकेतील तमिळीवर होणार्या अत्याचाराविरुद्ध ता. नाडुने आपली सॉफ्ट पॉवर कशी वापरली हे उत्तम उदाहरण आहे.
--अवांतर :आपल्या राज्याचा सुवर्णमहोत्सव जवळ येतोय; गुजरात मधे जोरदार तयार्या सुरु झाल्यात आपण काय करतोय ? न्युनगंडाचे राजकारण !!